Ad will apear here
Next
सैन्यदल गुप्तचर विभागाचे कायमच ऋणी : ले. जन. मनोज नरवणे
‘आर. एन. काव - जेंटलमन स्पायमास्टर’ या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन
‘आर. एन. काव - जेंटलमन स्पायमास्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) नितीन गोखले, वप्पाला बालचंद्रन, लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे, जयंत उमराणीकर आणि प्रशांत गिरबने.

पुणे :
‘सैन्य दलाचे कोणतेही ऑपरेशन हे गुप्तहेर खात्याने पुरविलेल्या माहितीशिवाय, मदतीशिवाय पूर्ण होऊ शकलेले नाही. सैन्यदलाला हवी असलेली ‘दुष्मन की खबर’ गुप्तहेर खाते नेहमीच पुरवीत असते. रिसर्च अँड अॅनालिसिस विंग अर्थात ‘रॉ’  हेदेखील अशाच खात्यांमधील एक आहे. गुप्तहेर विभागाच्या या सहकार्याबद्दल आम्ही नेहमीच त्यांचे ऋणी आहोत,’ असे प्रतिपादन भारतीय सैन्य दलाचे विद्यमान उपलष्करप्रमुख आणि भावी लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने, नितीन गोखले लिखित ‘आर. एन. काव - जेंटलमन स्पायमास्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन लेफ्टनंट जनरल नरवणे यांच्या हस्ते शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतेच करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

‘रिसर्च अँड अॅनालिसिस विंग’ अर्थात ‘रॉ’चे माजी विशेष सचिव वप्पाला बालचंद्रन, माजी पोलीस अधिकारी जयंत उमराणीकर, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी या वेळी उपस्थित होते.        

या वेळी लेफ्टनंट जनरल नरवणे म्हणाले, ‘गुप्तचर खाते म्हटल्यावर आपल्यासमोर थेट जेम्स बाँड येतो. इतकेच नाही तर गन्स, गिटार, ग्लॅमर म्हणजेच एखाद्या गुप्तहेराचे आयुष्य असा आपला समज असतो; मात्र तो चुकीचा असून, कधीही न पाहिलेले, ऐकलेले आणि नेहमीच पडद्यामागे राहणारे असे हे लोक असतात. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते करीत असलेली ही मदत सैन्य दलासाठी नेहमीच मोलाची ठरली आहे.’

नितीन गोखले लिखित ‘आर. एन. काव - जेंटलमन स्पायमास्टर’ या पुस्तकात गुप्तहेर खात्याच्या कामगिरीबरोबरच रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे पहिले प्रमुख आर. एन. काव यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला आहे. मूळचे काश्मीरमधील असलेल्या काव यांची कारकीर्द या पुस्तकामध्ये वाचकांना अनुभवायला मिळेल. 
या वेळी नितीन गोखले यांनी वप्पाला बालचंद्रन यांच्याशी संवाद साधून आर. एन. काव यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकून त्यांच्या काही आठवणींना, कामगिरीला उजाळा दिला.

वप्पाला बालचंद्रन म्हणाले, ‘आज आपल्या देशात सैन्य दलाकडे व गुप्तहेर खात्याकडे असलेली माहितीची कागदपत्रे नागरिकांना वाचण्यासाठी उपलब्ध नाहीत. सैन्य दल व गुप्तहेर खात्याकडील माहिती उघड करण्याची आज गरज आहे. यामध्ये प्रामुख्याने पाकिस्तानशी संबंधित माहिती, बांगलादेशाच्या निर्मितीवेळची कागदपत्रे व सुवर्णमंदिरात करण्यात आलेल्या ऑपरेशन्सच्या कागदपत्रांचा समावेश असावा. यामुळे खरा इतिहास समोर येईल. युद्धाशी संबंधित बाबी आणि अतिमहत्त्वाची माहिती वगळता अन्य माहितीपत्रे उघड व्हायला हवीत. त्यासाठी लोकशाहीमध्ये नवे कायदे करण्याची गरज आहे. वीस वर्षांनंतर ही कागदपत्रे खुली करून त्याचा उपयोग होणार नाही. पाच ते दहा वर्षांत ती खुली करण्यात यावीत.’

‘आर. एन. काव हे स्वतः एक संस्था होते, ज्यांच्याकडे दूरदृष्टी आणि प्रतिभा या दोन्ही गोष्टी होत्या. गुप्तचर विभागाच्या कामगिरीवर बोलताना नेहमीच त्यांची आठवण होईल. कारण त्यांची निष्ठा ही त्यांच्या विचारांशी, देशाशी होती राजकारण्यांशी नव्हती,’ असे मत जयंत उमराणीकर यांनी व्यक्त केले.  

(To read this news in English, please click here)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZGXCH
Similar Posts
R. N. Kao worked behind the scenes and helped build the R&AW : Lt. Gen. Naravane Pune : “The world of intelligence is not about glamour but its is about the unknown, the unseen and the unheard. It is about the people working behind the scenes who collect pieces of nuggets together to make a jigsaw puzzle. Rameshwar Nath Kao was one such officer who worked tirelessly in private for
रॉ - भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा मला ‘रॉ’ हे पुस्तक खूप आवडलं, याचं कारण म्हणजे एखादी गुप्तचर संस्था कशी उदयाला येते, आपल्याकडे तिची बीजं कुठे सापडतात हे या निमित्तानं ठाऊक झालं. अगदी ऋग्वेद काळापासून वरुण हा कसा आद्य गुप्तचर प्रमुख मानला गेला, अथर्ववेद, तैत्तिरीय संहिता, महाभारत, कौटिल्याचा काळ या सगळ्या वेळी गुप्तचर संस्था कशा काम
बॉब विलीस आपल्या वेगवान गोलंदाजीने एक काळ गाजवलेले इंग्लंडचे क्रिकेटपटू रॉबर्ट जॉर्ज डिलन उर्फ बॉब विलीस यांचे चार डिसेंबर २०१९ रोजी निधन झाले. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
लीलावती भागवत, कविता महाजन बालकुमार साहित्यात मोलाची भर टाकणाऱ्या लीलावती भागवत, सामाजिक विषमता आणि स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या कविता महाजन, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक भालचंद्र बहिरट, गोव्याविषयी विशेष संशोधन करणारे अनंत प्रियोळकर आणि ‘गावगाडा’कार त्रिंबक आत्रे या साहित्यिकांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस. त्यानिमित्त आज ‘दिनमणी’मध्ये या सर्वांचा अल्पपरिचय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language